Friday, February 13, 2015

'आयटी' गाथा एका बूमिंग उद्योगाचा विलक्षण प्रवास

पुस्‍तकाचे नावः 'आयटी' गाथा एका बूमिंग उद्योगाचा विलक्षण प्रवास
लेखक/संकलकः अतूल कहाते
राेहन प्रकाशन
पहिली आवृत्ती - 25 डिसेंबर 2013
मूल्‍य रु. 150/-

अनेक वर्षे माहिती तंत्रज्ञान ( आय.टी. ) उद्योगात काम केल्‍यानंतर श्री. अतूल कहाते यांनी या क्षेत्राचा भारताशी संबंधित असा थोडक्‍यात इतिहास लिहिलेला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राविषयी अमूल्‍य माहिती या पुस्‍तकामध्‍ये अापल्‍याला मिळते. या क्षेत्रामध्‍ये काम करणा-या तरुण पिढीच्‍या जीवनावर, या क्षेत्राचे कोणते परिणाम होतात. तसेच समाजजीवनावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे कोणते परिणाम होतात याची माहिती या पुस्‍तकामधून सोप्‍या भाषेत कळते.
मराठी भाषेमधून अशा प्रकारची पुस्‍तके एकंदरित कमीच असतात. आय.टी. उद्योगाचा इतिहास घडताना सदर लेखकाने पाहिला असून ही माहिती थेट आपल्‍या मातृभाषेमधून आपल्‍यापर्यंत येते. पृष्‍टसंख्‍या केवळ १५९ असली तरी प्रत्‍येक ओळ आपल्‍याबरोबर काही संदर्भ घेऊन येते. यामुळे एकदा वाचून हे पुस्‍तक समजल्‍यासारखे वाटते मात्र समजत नाही. विचारांना चालना देणारे असे हे पुस्‍तक आहे.

No comments: