Tuesday, September 13, 2011

एलफिस्‍टन

आठवणीतील पुस्‍तक -  एलफिन्‍स्‍टन
लेखक : प्रमोद ओक


या पुस्‍तकामध्‍ये मुंबईचा गव्‍हर्नर पहिला माउंटस्‍टुअर्ट एलफिस्‍टन याच्‍या कारकीर्दीविषई उत्तम माहिती आहे. आपल्‍याला हे माहिती असते की मराठ्यांचे राज्‍य इंग्रजांनी हर त-हेच्‍या उपायांनी जिंकून घेतले. पण यापेक्षा जास्‍त खोलात शिरण्‍याचे आपल्‍यासारखा सर्वसामान्‍य माणूस (यामध्‍ये ब्‍लॉग लेखक देखील आहेच . . . ) नाकारतो. 
  • मराठी सत्तेचा अंत का झाला? 
  • जो मराठी समाज औरंगजेबासारख्‍या भयंकर सत्ताधीशाला आटोपला नाही तो मराठी समाज इंग्रजांपुढे चीत कसा झाला
असे अनेक प्रश्‍न इतिहासाची थोडीफार आवड असलेल्‍यांना कधी कधी पडतात. याचे उत्तर हे पुस्‍तक वाचल्‍यावर मिळते. तसेच पेशवाई बुडाल्‍यावर जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली त्‍याची देखील थोडीफार कल्‍पना येते. 
पेशवाई बुडाल्‍यानंतर पहिला माउंटस्‍टुअर्ट एलफिन्‍स्‍टन याने जलदीने जिकडे तिकडे स्थिरस्‍थावर परिस्थिती निर्माण केली. याविषई लो. टिळकांनी केसरीमध्‍ये उत्तम वर्णन दिले आहे. 
 पहिला माउंटस्‍टुअर्ट एलफिन्‍स्‍टन जेव्‍हा निवृत्त होऊन इंग्‍लंड येथे परत गेला तेव्‍हा, त्‍याच्‍या स्‍मरणार्थ  एलफिन्‍स्‍टन टेक्निकल हायस्‍कूल ही तंत्राशिक्षण संस्‍था भारतीय लोकांनी वर्गणी काढून उभारली. मुंबईमधील मरीन लाईन्‍स स्‍टेशनजवळ (मेट्रो सिनेमा थिएटरच्‍या समोर) ही इ.स. 1823 च्‍या सुमारास उभारलेली ब्रिटिश पद्ध्‍तीची इमारत आजही उभी आहे. तेथे महाराष्‍ट्र शासनाने व्‍यवसाय मार्गदर्शनाचे वर्ग, तसेच व्‍यवसाय मार्गदर्शन केंद्र आहे. 
एतद्देशीय लोकांना शक्‍य तेवढे लवकर आधुनिक शिक्षण देऊन स्‍वतंत्रपणे राज्‍यकारभार करण्‍यास योग्‍यतेस चढवावे असे  पहिला माउंटस्‍टुअर्ट एलफिन्‍स्‍टन याचे धोरण होते. वरवर पाहता हे विसंगत दिसते पण बरेच वेळा सत्‍य हे कल्‍पनेपलिकडे असते असे यातून इतिहास शिकवितो. 

याच  पहिला माउंटस्‍टुअर्ट एलफिन्‍स्‍टन याने पेशव्‍यांच्‍या दरबारामध्‍ये राहून (रेसिडन्‍ट - निवासी वकील) विविध प्रकारची कारस्‍थाने करुन पेशवाई बुडविली. एक वेळ अशी आली होती की याला अंगावरच्‍या कपड्यांनिशी आपल्‍या पुणे येथील राहत्‍या बंगल्‍यामधून पळून जावे लागले. मुळा-मुठा संगमावर असलेला याचा बंगला मराठ्यांनी लावलेल्‍या आगीत भस्‍मसात झाला व त्‍याचबरोबर सर्व कागदपत्रे देखील आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडली. असे बरेच मनोरंजक किस्‍से या पुस्‍तकामध्‍ये आपल्‍याला वाचावयास मिळतात. 

No comments: