Tuesday, September 13, 2011

रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई


आठवणीतील पुस्‍तक -  रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई
(महाराष्‍ट्र चरित्र ग्रंथमाला संच)
प्रकाशकः गंधर्व-वेद प्रकाशन, पुणे
gandharv_ved@hotmail.com



या पुस्‍तकामध्‍ये रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे थोडक्‍यात चरित्र, त्‍यांचे कार्य व त्‍यांच्‍या कार्यावर टीकाकरांनी केलेल्‍या टीकेचा समावेश आहे. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मुस्लिम आमदानीपासूनचा इतिहास लिहिला आहे. सध्‍या या इतिहासमालेचे 8 खंड पॉप्‍युलर प्रकाशनाने पुनर्प्रकाशित केले आहेत. यामधील एक खंड वाचत असतांनाच मला रियासतकारांचे चरित्र वाचावयास मिळाले. 
रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्‍ये आपले इतिहासलेखनाचे कार्य वर्षानुवर्षे चालू ठेवले आणि तडीस नेले याविषईची माहिती साध्‍या सरळ भाषेमध्‍ये सर्वसामान्‍य वाचकांना मनोरंजक वाटेल अशा प्रकारे दिलेली आहे. 


महाराष्‍ट्र चरित्र ग्रंथमालेच्‍या अंतर्गत, गंधर्व-वेद प्रकाशन यांनी 61 चरित्रे प्रकाशित केली आहेत. प्रकाशक लिहितात - 
मराठेशाही अस्‍तंगत होऊन ब्रिटिश अंमल येथे स्थिरावणे, ही एक अतिशय मूलगामी आणि बहूआयामी प्रक्रिया होती. ते स्थित्‍यंतर केवळ राजकीय नव्‍हते. सांस्‍कृतिक, सामाजिक, भाषिक अशी अनेकानेक परिमाणे त्‍यास होती. सर्वांगीण बदलांच्‍या वेगवान प्रवाहात जोराने फेकल्‍या गेलेल्‍य मराठी समाजाची नव्‍याने, कालोचित आणि प्रगल्‍भ पुनर्रचना करण्‍याचे जबरदस्‍त आव्‍हान तत्‍कालीन समाजातील तितक्‍यातच कर्तृत्‍ववान व्‍यक्तिंनी पेलले. मराठी समाजमानसाची जडणघडण नव्‍याने करण्‍यासाठी त्‍यांनी आपली आयुष्‍ये वेचली. खस्‍ता खाल्‍ल्‍या. समाजबांधणीच्‍या त्‍या कामास संस्‍थात्‍मक तसेच व्‍यवस्‍थात्‍मक अधिष्‍ठान लाभावे यासाठी संस्‍था स्‍थापन केल्‍या, वाढवल्‍या. . . . . . . . .  आजच्‍या 21व्‍या शतकातील प्रगत महाराष्‍ट्रात नांदणार-या प्रगल्‍भ पिढीला पूर्वसुरींच्‍या कर्तृत्‍वाचे दर्शन घडवण्‍याबरोबरच तिच्‍या कर्तव्‍याचीही जाणीव करुन देणे, या नम्र हेतूने . . . . . . . . 

No comments: