पुस्तकाचे नावः विसाव्या शतकातील गाजलेले दहा वृत्तपत्र संपादक
लेखकः अनिल बळेल
स्नेहल प्रकाशन
प्रथमावृत्ती 2 ऑक्टोबर 2010
मूल्य रु. 175/-
या पुस्तकामध्ये इ.स. 1900 ते 2000 मधील गाजलेल्या दहा संपादकांच्या कारकीर्दीचे विस्तृतपणे वर्णन केले आहे. प्रत्येक संपादकाचे काम एकच तरीही माणूस म्हणून प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे, स्वभाव वेगळा हे सर्व या लेखांमधून चांगले समजते. तसेच आपण जे वर्तमानपत्र बघतो त्याच्या आकर्षक स्वरुपामागे किती मेहनत व खोलवर विचार केला आहे हे देखील लक्षात येते.
सकाळ दैनिकाचे संस्थापक श्री. परुळेकर यांचा कटाक्ष असे की सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या वर्तमानपत्रामधील बातमी सहजपणे वाचता आली पाहिजे. त्याप्रमाणे ते बातम्या लिहित.
तरुण भारत हे रा.स्व. संघाचे मुखपत्र जेव्हा स्थापन झाले तेव्हा प्रत्यक्षात कम्युनिस्ट वृत्तपत्र म्हणून स्थापन झाले मात्र नंतर काही आर्थिक अडचणींमुळे ते मुखपत्र विकावे लागले व रा. स्व. संघाच्या लोकांनी ते विकत घेतले.
महाराष्ट्र टाईम्स चे संपादक श्री. गोविंदराव तळवलकर हे बातम्या देतांना अशा प्रकारे देत की सकाळी ऑफिसला जायला निघालेल्या माणसाला, चहा पिता पिता दहा मिनिटात पेपरवरुन नजर फिरवून सर्व बातम्या झटकन समजल्या पाहिजेत.
तांत्रिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या प्रगत अशा इंग्रजी वर्तमानपत्रांच्या तूलनेने अनेक मराठी वर्तमानपत्रांकडे साधनसामग्री व आर्थिक बळ अगदी थोडे होते. मात्र पत्रकारिता निष्ठेने करणारे लोक संपादक म्हणून लाभल्याने ही मराठी वर्तमानपत्रे कशी उदयास आली याचे वर्णन देखील या पुस्तकामध्ये वाचावयास मिळेल.

No comments:
Post a Comment