Saturday, September 17, 2011

अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्‍ड


अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्‍ड (अनुवादित पुस्‍तक)
लेखकः एन. आर. नारायणमूर्ती
अनुवादः चित्रा वाळिंबे
मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रथमावृत्ती जून 2010
मूल्‍य रु. 250/-

या पुस्‍तकामध्‍ये इंन्‍फोसिस कंपनीचे एन. आर. नारायणमूर्ती यांनी जगभरातील वेगवेगळ्या शिक्षणसंस्‍थांमध्‍ये निमंत्रित म्‍हणून दिलेली व्‍याख्‍याने आहेत. तसेच पुस्‍तकाच्‍या प्रस्‍तावनेमध्‍ये भारताच्‍या सद्यस्थितीविषई परखड विश्‍लेषण आहे.

पुस्‍तकामधील उद्बोधक प्रसंगः
एका विदेशी कंपनीशी सौदा करतांना त्‍या कंपनीच्‍या जाचक अटी मान्‍य करण्‍याचे नाकारुन आम्‍ही त्‍या कंपनीशी संबंध तोडून बाहेर पडलो. त्‍या कंपनीची सौदा करण्‍याची पद्धत अतिशय आक्रमक होती. अतिशय मोठी अशी ती कंपनी होती. एका विशिष्‍ठ दिवशी एका हॉटेलच्‍या वेगवेगळ्या खोल्‍यांमध्‍ये आमच्‍यासारख्‍या छोट्या छोट्या कंपन्‍यांचे प्रतिनिधी जमवून ती कंपनी व्‍यवहाराची बोलणी करीत असे

हे करतांना एका कंपनीच्‍या प्रतिनिधींवर अन्‍य प्रतिस्‍पर्धी कंपनीला कॉन्‍ट्रॅक्‍ट देण्‍याची धमकी देऊन दडपण आणले जात असे व भाव खाली उतरविले जात असत

या कंपनीकडून इन्‍फोसिसला एकूण महसूलाच्‍या 25 टक्‍के महसूल मिळत होता. यानंतर इन्‍फोसिसमध्‍ये एका मंडळाची स्‍थापना करण्‍यात आली. या मंडळाच्‍या सूचनेनुसार इन्‍फोसिस कधीही एक ग्राहक, एक तंत्रज्ञान, एक देश, एक अॅ प्लिकेशन किंवा एका कर्मचा-यावर अवलंबून राहिली नाही

No comments: