चंची
लेखकः शिरीष कणेकर
दिलीप प्रकाशन
पहिली आवृत्ती मे 2011
मूल्य रु. 250/-
शिरीष कणेकरांचे सदतिसावे पुस्तक चंची. गेली अनेक वर्षे खुमासदास भाषेमध्ये आपल्याला हसविणा-या या लेखकाचे वय झाले आहे हे पुस्तकाची प्रस्तावना वाचता वाचता व या पुस्तकातील काही लेख वाचता वाचता लक्षात येते आणि फार काही बरे वाटत नाही.
आपला आवडता लेखक नेहमी तरुणच रहावा असे सर्व वाचकांना का वाटते?
वेगवेगळ्या विषयांवरील विनोदाचा साज चढविलेले हे लेख आहेत. मात्र कधीकधी विनोदाच्या वेषात एखादा गंभीर विषय देखील वाचकांसमोर येतो. एरवी असा गंभीर विषय चतुर आणि चाणाक्ष वाचकांनी एक झोकदार वळण घेऊन बाय-पास केला असता पण विनोदाच्या वेषामध्ये आलेले हे गंभीर विषय वाचून नशीब किंवा नियती नावाच्या गोष्टीविषई आपण विचार करु लागतो.
सतत गंभीर विषय वाचून वाचून गांजलेल्या डोक्यासाठी असे पुस्तक फार उपयुक्त ठरते . . .

No comments:
Post a Comment