Friday, September 23, 2011

Inside WikiLeaks (My Time with Julian Assange at the World's Most Dangerous Website).


पुस्‍तकाचे नावः Inside WikiLeaks
My Time with Julian Assange at the World's Most Dangerous Website.
लेखकः Mr. Domscheit-Berg

विकीलिक्‍स या गाजलेल्‍या वेबसाईटच्‍या कार्यपद्धतीचे वर्णन करणारे हे पुस्‍तक आहे. समाजामधील शक्तिशाली, प्रतिष्ठित, वाटेल त्‍या मार्गाने धन एकत्र करणा-या लोकांचे अंतरंग उघड करण्‍याच्‍या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येतो याचे उत्तम उदाहरण म्‍हणजे ही वेबसाईट. एका चळवळीच्‍या स्‍वरुपात सुरु झालेली ही वेबसाईट पुढे इतकी नावारुपास येईल असे तिच्‍या निर्मात्‍यांनादेखील वाटले नव्‍हते. या वेबसाईटने मोठमोठ्या बँकांचे व्‍यवहार चव्‍हाट्यावर आणले. मोठमोठ्या राजकारण्‍यांची झोप उडविली. मोठमोठ्या प्रतिष्ठित आणि समाजमान्‍य अशा लोकांना चारचौघांमध्‍ये लाज आणली . . . . . आणखी बरेच काही . . . . . 

भारताच्‍या यु.आय.डी. कार्यक्रमाविषई भारत सरकारचे धोरण या वेबसाईटने नुकतेच प्रकाशित केले आहे. फक्‍त आवश्‍यक ती पीडीएफ फाईल आपल्‍या कॉम्‍प्‍युटरवर कॉपी करुन घ्‍यायची आणि वेळ काढून वाचायची.

या वेबसाईटची कार्यपद्धत वाचण्‍यासारखी आहे. वेबसाईटचा निर्मात ज्‍युलियन असांजे, त्‍याचा सहकारी आणि सदर पुस्‍तकाचा लेखक बर्ग, एक नेट-आर्किटेक्‍ट आणि एक नेट-टेकची (टेक्‍नीशियन) अशा चार मुख्‍य लोकांचा आणि असंख्‍य कार्यकर्त्‍यांचा सहभाग असलेली ही वेबसाईट. 

पहिल्‍यापासूनच आपण एक अतिशय मोठ्या कंपनीचे छोटेसे प्रोजेक्‍ट आहोत अशी बतावणी करुन. स्‍वतःची वैयक्तिक ओळख कुठेही न देता व अतिशय कमी खर्चामध्‍ये आपली वेबसाईट तयार करुन, चालवून आणि नावारुपाला आणली. जर्मनीमधून हे सर्व कारभार चालत. 

ज्‍युलियन असांजे व बर्ग हे दोघेही चळवळ्या स्‍वभावाचे. खोट्याची चीड असलेले पाश्‍चात्‍य मध्‍यमवर्गीय सुखवस्‍तु. त्‍यांच्‍याचसारख्‍या असंख्‍य कार्यकर्त्‍यांच्‍या मदतीने त्‍यांनी विकीलिक्‍स वेबसाईट "हिट" केली. 

हे पुस्‍तक आपल्‍या ग्रंथालयामधून मिळवून मुद्दाम वाचण्‍याजोगे आहे. 

No comments: