Monday, October 3, 2011

गूगल लायब्ररी

इंटरनेटचा प्रसार होता होता अशा काही चमत्‍कारिक गोष्‍टी आपल्‍या समोर येत आहेत की पूर्वी कधी याची कल्‍पनादेखील केली नसेल. त्‍यामधीलच एक म्‍हणजे गूगलचे ग्रंथालय. गूगल या कंपनीने हजारो पुस्‍तके आपल्‍या लायब्ररीमध्‍ये ठेवली आहेत आणि विशिष्‍ठ पद्धतीने ती डाऊनलोड करुन घेता येतात. पीडीएफ फाईलच्‍या स्‍वरुपात ही पुस्‍तके आपल्‍याला अक्षरशः मोफत मिळतात. इ.स. 1800 ते 1900 मधील अनेक पुस्‍तके ज्‍यांचे कॉपीराईट एक्‍स्‍पायर झाले आहेत अशी पुस्‍तके पीडीएफ स्‍वरुपामध्‍ये खूप आहेत. यामध्‍ये इंग्रज अधिका-यांनी भारताविषई लिहिलेली अनेक पुस्‍तके आहेत. जेम्‍स ग्रँट डफ कृत मराठ्यांचा इतिहास हे दुर्मिळ पुस्‍तक येथे मिळते. जर आपण ते बाहेर विकत घ्‍यायला गेलो तर भरपूर पैसे खर्च करून देखील ते मिळेलच याची खात्री नाही. शैक्षणिक संस्‍थांकरिता आपली ई-लायब्ररी अद्ययावत करण्‍यासाठी या पुस्तकांचा फार चांगला उपयोग होईल. तसेच पीडीएफ फाईलमध्‍ये सर्च ची सोय असल्‍यामुळे एखाद्या विशिष्‍ठ विषयाचा अभ्‍यास करण्‍यासाठी ही पुस्‍तके कॉम्‍प्‍युटरवर हाताळणे अतिशय सोईचे आहे. म्‍हणजे तुम्‍ही एखाद्या विषयासंबंधी अधिक माहिती शोधत आहात व त्‍या विषयाशी संबंधित पुस्‍तक गूगल इंटरनेट लायब्ररी वरुन डाऊनलोड करुन घेतले आहे तर त्‍या पुस्‍तकामध्‍ये एखादा विशिष्‍ट शब्‍द आहे का हे तुम्‍ही बघू शकता.

गूगल लायब्ररीमधून पुस्‍तके डाऊनलोड करुन घेण्‍याची कृती पुढीलप्रमाणे -

1) पुढील वेबसाईटवर जावे http://anonymouse.org/ या वेबसाईटचे वैशिष्‍ट्य असे की या वेबसाईटवरुन इतर वेबसाईटचे सर्फिंग करीत असतांना आपला आय.पी. अॅड्रेस इंटरनेटवर नोंदला जात नाही. माझ्याकडे असलेल्‍या माहितीप्रमाणे भारतामधील सर्व्‍हर्सवरुन गूगलची पुस्‍तके डाऊनलोड करता येत नाहीत. त्‍यामुळे आपण वरील वेबसाईटवरुन गूगलची वेबसाईट वापरायची म्‍हणजे आपल्‍याला पुस्‍तके डाऊनलोड करता येतात. 

2) वरील वेबसाईटमधून गूगलच्‍या वेबसाईटवर जावे. http://books.google.co.in/  या वेबसाईटवर सर्च मधून किंवा अॅडव्‍हान्‍स्‍ड सर्च मधून योग्‍य तो विषय द्यायचा आणि सर्च करायचे आणि फक्‍त फुल व्ह्यू पुस्‍तके सिलेक्‍ट करायची. फुल व्ह्यू पुस्‍तके म्‍हणजे जी पुस्‍तके पूर्णपणे मोफत उपलब्‍ध आहेत अशी पुस्‍तके. डाऊनलोड करण्‍याची पायरी जवळ आली की वरील ब्राऊझरच्‍या विंडोमधून वेबसाईट अॅड्रेस कॉपी करुन तो गूगल क्रोम मध्‍ये पेस्‍ट करायचा.

3) एक कोडवर्ड टाकून पीडीएफ फाईल डाऊनलोड करायची.

वरील पाय-यांमधून जातांना तुम्‍हाला काही अडचणी नक्‍कीच येतील.
काही शंका असतील तर पुढील ई मेल आय.डी. वर संपर्क करावा.
mandarkarmarkar@yahoo.co.in

No comments: