Monday, October 3, 2011

धार्मिक विषयासंबंधी पुस्तके




धार्मिक विषयासंबंधी पुस्तकांची उत्तम वेबसाईट म्‍हणून पुढील वेबसाईट बघावी.
http://www.gitapress.org/


या वेबसाईटवरुन पुस्तके ऑनलाईन विकत देखील घेता येतात. लहान मुलांकरिता देवादिकांची सुंदर चित्रे असलेली पुस्‍तके. मोठ्यांच्‍या करिता धार्मिक विषयांवरील सोपी पुस्‍तके अशी अनेक पुस्‍तके मिळतात. आपल्‍याला कल्‍पना करता येणार नाही एवढी विविधता या पुस्‍तकांमध्‍ये आहे. एकदा धार्मिक विषयांवरील पुस्‍तके असे म्‍हंटले की आपल्‍याला वाटते की स्‍तोत्रे, मनाचे श्‍लोक इत्‍यादी असतील पण तसे नाही. येथे धार्मिक या सदराखाली इतक्‍या विविध प्रकारची पुस्‍तके उपलब्‍ध आहेत की काय घेऊ आणि काय नाही असे होते. अधिक माहितीकरिता वरील वेबसाईटवरील कॅटलॉग पहावा. 

अनेक भारतीय भाषांमध्‍ये ही पुस्‍तके मिळतात. एकेका पुस्‍तकाच्‍या दहा-बारा आवृत्‍त्‍या निघालेल्‍या असतात आणि एका आवृत्तीमध्‍ये किती पुस्‍तके छापली जातात . . . . . कल्‍पना करा . . . . . धार्मिक विषयावरील पुस्‍तके  . . . . . दहा हजार.

    
मुंबईमध्‍ये मरील लाईन्‍स स्‍टेशनच्‍या बाहेर, पूर्वेच्‍या बाजूला, स्‍टेशनपासून पाच मिनिटांच्‍या अंतरावर गीता प्रेस चे दुकान आहे. येथे ओपन अॅक्‍सेस पद्धत आहे. म्‍हणजे येथे आपल्‍याला फिरुन पुस्‍तके बघता येतात. पुस्‍तके हाताळता येतात. ही पुस्‍तके अतिशय वाजवी किंमतीत विकत मिळतात. 

सुंदर छपाई, वाचनीय मजकूर आणि वाजवी किंमत हे या पुस्‍तकांचे वैशिष्‍ट्य आहे. 

No comments: