पुस्तकाचे नावः समाजपुरुष जगन्नाथ शंकरशेट
लेखिकाः अमला नेवाळकर
प्रकाशकः श्री गंधर्व वेद प्रकाशन
प्रकाशनः नोव्हेंबर 2010
मूल्यः रु. 180/-
gandharv_ved@hotmail.com
लेखिकाः अमला नेवाळकर
प्रकाशकः श्री गंधर्व वेद प्रकाशन
प्रकाशनः नोव्हेंबर 2010
मूल्यः रु. 180/-
gandharv_ved@hotmail.com
जगन्नाथ शंकरशेट यांचे संक्षिप्त चरित्र. प्रथितयश व्यापारी शैक्षणिक कार्याकरिता स्वतःचे जीवन कसे कारणी लावतो याची गोष्ट. इंग्रजांच्या अंमलाखालील भारताकरिता काय आवश्यक आहे याची जाण असल्यामुळे जगन्नाथ शंकरशेट यांनी शैक्षणिक संस्था उभारण्याकरिता आपले तन-मन-धन कारणी लावले. तसेच आधुनिक मुंबईची पायाभरणी करण्यामध्ये पुढाकार घेणारे एक पुढारी, देणगीदार म्हणून देखील नानांचे कार्य वाखाणले आहे.
हे पुस्तक वाचतांना असे जाणविते की, ब्रिटिश राज्यकर्ते जरी परकीय होते तरी त्यांना सनदशीर मार्गाने प्रयत्न केल्यावर काही सुधारणा नाईलाजाने का होईना कराव्या लागल्या आणि पुढे नकळतपणे असेही जाणविते की राज्यकर्ते म्हणून त्यांची सद्सद्विवेकबुद्धी आजच्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त प्रखर होती. पिढ्यानपिढ्या मुंबईमध्ये राहिलेल्या माणसांच्या मानसिकतेमधील फरक देखील जाणवितो कारण मराठेशाही बुडाल्याचे दुःख जसे उर्वरित महाराष्ट्रामधील जनतेला झाले तसे मुंबईमधील माणसांना झाले नसावे कारण ते ब्रिटिश अमलाखालीच रहात होते. मात्र ब्रिटिशांची मानसिकता मुंबईमधील सुजाण नागरिक उत्तम प्रकारे ओळखून होते. सनदशीर मार्गाने प्रयत्न केल्यास ब्रिटिशांना देखील रास्त मागण्या मान्य करणे कठीण जात असे असे आणखी बरेच काही . . .
या पुस्तकामधील सर्वात वाचनीय भाग म्हणजे, बॉम्बे असोसिएशनची स्थापना (इ.स. 1852). नाना शंकरशेटांच्या प्रोत्साहनाने जनमत जागृतीसाठी, भारतीयांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी व राजकीय सुधारणा घडवून आणण्याकरिता - बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. या बॉम्बे असोसिएशनचेच रुपांतर पुढे - इंडियन नॅशनल कॉंग्रेस मध्ये झाले (इ.स. 1885). ब्रिटिशांना त्यांच्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षणाप्रमाणे शिक्षण घेऊन तसेच ब्रिटिश राजसत्तेची पूर्ण ओळख झालेली नवीन पिढी, ब्रिटिशांप्रमाणे संस्था स्थापन करुन राजकीय सुधारणांची मागणी करु लागली. ही मागणी सनदशीर मार्गाने असल्यामुळे - न्यायप्रीय ब्रिटिश कंपनीची पंचाईत झाली. या संघटनेमध्ये म्हणजेच बॉम्बे असोसिएशनमध्ये प्रतिष्ठित व्यापारी, उच्चशिक्षित तरुण असे लोक असल्यामुळे व त्यांच्यामधील अनेक जण पिढ्यानपिढ्या मुंबईचे रहिवासी असल्यामुळे बॉम्बे असोसिएशनवर बंदी घालणे देखील कठीण होऊन बसले. यामध्ये बहुसंख्येने पारशी व गुजराती व्यापारी होते. त्यांचे स्थानिक इंग्रजांशी जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले होते. बरेचसे इंग्रज अधिकारी देखील भारताच्या विकासाकरिता प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होते त्यामुळे बॉम्बे असोसिएशनला यश मिळविणे सोपे गेले.
गिरगावामध्ये जगन्नाथ (नाना) शंकरशेटांचा वाडा होता. आत्ता (इ.स. 2011) साठीला आलेल्या स्थानिक लोकांच्या आठवणीमध्ये तो वाडा आहे. काही वर्षांपूर्वीच या वाड्याच्या जागी मोठी इमारत बांधली गेली.

चरित्र वाचतांना काय होते की गोष्ट वाचण्याच्या नादामध्ये आपण कठीण कठीण गोष्टी देखील सहजपणे समजून घेऊ शकतो. गोष्ट ऐकणे/वाचणे कुणाला आवडत नाही?
शैक्षणिक संस्था चालविणार-या लोकांनी, शैक्षणिक संस्थांशी संबंधित लोकांनी आवर्जुन वाचावे असे पुस्तक.

No comments:
Post a Comment