http://en.wikipedia.org/wiki/Main_Page
एखादे पुस्तक वाचत असतांना आपल्याला काही बाबतीत विशेष माहिती किंवा विस्तारित स्वरुपामधील माहिती मिळवावी अशी इच्छा होते, पण अशी माहिती आपल्याला कुठे मिळेल हे माहीत नसते. विकीपीडिया हा ऑनलाईन ज्ञानकोष याबाबतीत उत्तम काम करतो. उदाहरणार्थ आपल्याला एखादे पुस्तक वाचतांना - ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या विषई जास्तीची माहिती घ्यावी असे वाटले तर विकीपीडियाच्या सर्च विंडोमध्ये - ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे हे टाईप करावे. यानंतर काही सेकंदांमध्येच विकीपीडियामधील सर्व माहिती आपल्यासमोर येते.
या ज्ञानकोषामधील एंट्रीज अद्ययावत असतात तसेच त्या एंट्रीज तज्ञांच्या सहाय्याने केल्या जातात यात संशय नाही. या एंट्रीज आपल्यासारखा सामान्य वाचक एडिट करु शकतो मात्र हे बदल कायम करण्याचे किंवा न करण्याचे अधिकार विकीपीडियाने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत.
महाराष्ट्रामधील काही गावांविषई देखील उत्तम माहिती दिली आहे. उदा. रायगड जिल्ह्यातील पेण हे गाव. याची माहिती विकीपीडियामध्ये उत्तमरित्या दिलेली आहे. पेणच्या कोल्ह्टकरांची मुलगी सदाशिवरावभाऊ पेशवे यांना दिली होती ही माहिती देखील विकीपीडियामध्ये आहे. हे बघून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अगदी स्थानिक पातळीवरील माहिती देखील विकीपीडिया कशी मिळवितो हा प्रश्न मला पडला.
विकीपीडियाचे स्थानिक भाषांमधील अवतार देखील आहेत व त्यावर स्वयंसेवकांची नोंदणी चालू असते. या स्वयंसेवकांनी म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी विकीपीडियाचे भाषांतर इत्यादीचे काम करुन द्यावे अशी अपेक्षा असते. मात्र इंग्रजी विकीपीडियाचे स्वरुप, आवाका बघितल्यावर असे लक्षात येते की, अनेक पगारी लोक सदर वेबसाईट अद्ययावत ठेवण्याकरिता झटत असावेत.
No comments:
Post a Comment