Wednesday, October 19, 2011

संस्‍कार

पुस्‍तकाचे नावः संस्कार
लेखकः वि. गो. कुलकर्णी
प्रकाशकः मनोविकास प्रकाशन
प्रकाशन दिनांकः 14 नोव्‍हेंबर 2003
मूल्‍यः 100/-

या पुस्‍तकाचे वर्णन करणे कठीण आहे. मात्र हे पुस्‍तक संग्रही ठेवण्‍याजोगे आहे, एवढेच मी सांगू शकतो. जेव्‍हा कधी निवांत वेळ मिळेल तेव्‍हा या पुस्‍तकामधील एक प्रकरण वाचावे आणि त्‍यावर चिंतन करावे. आपल्‍याला आपलेच जीवन त्‍या लेखांमध्‍ये दिसते. आपल्‍याच आयुष्‍यातील प्रसंग त्‍या लेखांमध्‍ये आपण वाचत असतो आणि नवीन काही शिकत असतो. मात्र हे शिकणं कंटाळवाणं नसतं, तर आनंददायी असतं.

भारतीय नागरिक म्‍हणून आपल्‍यामध्‍ये काय कमतरता आहेत तसेच मराठी माणूस म्‍हणून आपल्‍यामध्‍ये काय कमतरता आहेत याचे वर्णन छोट्या छोट्या किश्‍श्‍यांमध्‍ये सांगितले आहे. मात्र एवढेच नाही आणखी देखील बरेच काही आहे.

इ.स. 2000 च्‍या पुढेमागे लोकसत्ता दैनिकाच्‍या रविवारच्‍या अंकामध्‍ये श्री. वि. गो. कुलकर्णी यांचे लेख छापून येत असत. त्‍या लेखांनाच पुस्तकाचे स्‍वरुप दिले आहे.


No comments: